बाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंथा मुंबई च्या मलकापूर शाखेचा ४ था वर्धापनदिन संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : बाजीराव पाटील नागरी सहकारी पतसंथा मुंबई च्या मलकापूर शाखेचा ४ था वर्धापनदिन दि. ८ मे रोजी संपन्न झाला.

मलकापूर येथील गणेश मंदिरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील, संचालिका सौ. श्वेता पाटील, व व्यवस्थापकीय संचालक संपतराव पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी दिलीपराव पाटील यांनी पाहुण्यांचे व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मलकापूर शाखेतील नूतन संचालक मंडळ फलकाचे अनावरण अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मलकापूर शाखेचे नुतन चेअरमन श्र एन.बी. पाटील व संचालक मंडळ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तसेच बांबवडे शाखेचे चेअरमन व संचालक मंडळ यांच्या फलकाचे अनावरण अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये बांबवडे शाखेच्या चेअरमन पदी श्री जनार्दन गुरव सर व आठ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबई शाखेच्या संचालक मंडळाच्या वतीने मलकापूर शाखेचे चेअरमन श्री एन.बी. पाटील सर व श्री जनार्दन गुरव सर व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांचे स्मृतीचिन्ह, शाल, व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक संपतराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या विकासाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडण्यात आला. तसेच संस्थेच्या वाटचाली विषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी संस्थेसाठी दिलेले योगदान याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेच्या शाखांचा विस्तार असाच होवू दे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्याक्त केली.

या कार्यक्रम प्रसंगी को.जि.मा.शी.चे संचालक प्रकाश कोकाटे, एन.बी.पाटील सर, संचालिका सौ. श्वेता पाटील, जनार्दन गुरव सर, दिलीप पाटील सर, सुरेश नारकर बापू शाखा संचालक यांनी आपली मनोगते व्यक्त केलीत. यामध्ये संस्थेच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचे आश्वासन दिले, तसेच संस्थेच्या प्रगतीसाठी ठेवी आणून संस्थेच्या प्रगतीत भर टाकण्याचे देखील आश्वासन उपस्थितांना वक्त्यांनी दिले.

कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रंजना पाटील, सर्वश्री सर्जेराव नलगे, शाखा व्यवस्थापक शिवाजी पाटील, सुधीर कुंभार, राजेश पाटील, सचिन तांदळे, दीपक लाड, व विविध संस्थेतील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी मलकापूर शाखा व्यवस्थापक श्री भाऊसाहेब पाटील यांनी आभार मानले.