मुंबई चे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुंबई प्रतिनिधी : मुंबई चे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज पहाटे दोन वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.

श्री विश्वनाथ महाडेश्वर हे २००२ मध्ये मुंबई मध्ये नगरसेवक झाले होते. त्यानंतर २०१७ ते २०१९ या कालावधीत त्यांनी मुंबई चे महापौर पद भूषविले होते. ते नागरी शिक्षण समिती चे अध्यक्ष होते. स्थायी समितीचे सदस्य पद देखील त्यांनी भूषविले होते.


आज दुपारी सांताक्रूझ येथील संभाजी विद्यालय मध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.


त्यांच्या अंत्यदर्शनासाठी उद्धव ठाकरे आज दुपारी जाणार आहेत.