डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी संजय मधुकर पाटील यांची निवड
मलकापूर प्रतिनिधी : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी संजय मधुकर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

शाहुवाडी इथं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या तालुकास्तरीय निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष सुकुमार कांबळे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश चांदणे आप्पा यांच्या नेतृत्वाखाली या निवडी संपन्न झाल्या.

यावेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण घेवदे, युवा नेते किसन चांदणे, जिल्हाध्यक्ष कासीम गोलंदाज, जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत मोरे, व्यसन मुक्ती अध्यक्ष बाबू पवार, प्रताप चांदणे, वैभव पाटोळे, निरंजन पांढरबळे, यांच्या उपस्थितीत या निवडी संपन्न झाल्या.