शहीद वीर जवान सावन बाळकू माने यांच्या मेमोरियल गौरव स्तंभाचा उद्घाटन सोहळा संपन्न
बांबवडे प्रतिनिधी : गोगवे तालुका शाहुवाडी येथील शहीद वीर जवान सावन बाळकू माने यांच्या मरणोत्तर मेमोरियल स्तंभाचा उद्घाटन सोहळा गोगवे येथील क्रीडा संकुलात संपन्न झाला. शहीद वीर जवान सावन बाळकू माने यांना गौरव मेडल प्राप्त झाले आहे..


या उद्घाटन सोहळ्य प्रसंगी वीर माता सौ शोभाताई बाळकू माने, वीर पिता बाळकू श्रीपती माने यांच्यासह आमदार डॉ. विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड या लोकप्रतिनिधींसह शाहुवाडी चे तहसीलदार रामलिंग चव्हाण, महादेवराव पाटील, जि.प. सदस्य हंबीरराव पाटील, कोल्हापूर जिल्हा सैनिक संघटनेचे अध्यक्ष समीर खानोलकर, आजी-माजी सैनिक संघटनेचे शाहुवाडी अध्यक्ष सुभेदार अनंत भारमल, सागर माने सेना जवान, गोगवे सरपंच मानसिंग पाटील, यांच्यासह आजी-माजी सैनिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्तंभाला पुष्पहार अर्पण करून, मानवंदना दिली.

तसेच ग्रामस्थ व नागरिकांनी शहीद सावन माने यांना आदरांजली वाहिली.