अज्ञात चोरट्याने पावणेदोन तोळ्याचा सोन्याचा ऐवज दुचाकीवरून चोरून नेला : करंजोशी जवळील घटना
बांबवडे : परखंदळे तालुका शाहुवाडी येथील संजय आकारम पिंपळे यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचा सुमारे पावणेदोन तोळ्याचा ऐवज अज्ञात दुचाकी स्वाराने हिसडा मारून चोरून नेला आहे. तशा आशयाची फिर्याद शाहुवाडी पोलीस ठाणे इथं नोंद करण्यात आली आहे.

सदर ची घटना शनिवार दि.१३ मे रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान करंजोशी जवळ असलेल्या म्हसोबा मंदिर च्या वळणावर घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली हकीकत अशी कि, संजय आकारम पिंपळे वय ( ४६ वर्षे ) रहाणार परखंदळे पैकी पिंपळेवाडी तालुका शाहुवाडी हे आपल्या सासरवाडी हून त्यांची पत्नी वंदना यांच्यासह आपल्या गावाकडे दुचाकी वरून येत होते. करंजोशी जवळ असलेल्या म्हसोबा मंदिर च्या जवळ एका वळणावर एका दुचाकी वरील अज्ञात इसमाने त्यांच्या पत्नी च्या गळ्यातील सोन्याचा नेकलेस सुमारे सव्वा तोळे , त्याचबरोबर अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे डोर्ले असा ऐवज हिसडा मारून तोडून नेला. दुचाकीवरून आलेला अज्ञात इसम हा बांबवडे दिशेला भरधाव वेगाने निघून गेला.

सदर घटनेचा तपास शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.