” छत्रपती संभाजी महाराज ” यांना धर्माच्या जोखडात अडकवू नका – श्री भाई भारत पाटील
सरूड प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड त्यागातून स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण केले. सर्वसामान्य रयतेला न्याय दिला. म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्यरक्षक हीच खरी ओळख आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना कोणत्याही धर्माच्या जोखडात ण अडकविता त्यांचे मोठेपण समजून घ्यावे, असे मत ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील यांनी व्यक्त केले.

सरूड तालुका शाहुवाडी इथं आरपीआय गवई गट व समविचारी संघटनांनी मिळून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमात भाई भारत पाटील प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रकाश माने यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार घालण्यात आला.

यावेळी भाई भारत पाटील पुढे म्हणाले कि, काही विकृत इतिहासकारांनी संभाजी महाराजांविषयी चुकीचा इतिहास जनतेसमोर मांडला. तो इतिहास खोडून काढत खरा इतिहास समाजामध्ये रुजविण्याची जबाबदारी तरुण पिढीने पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास प्रा. प्रकाश नाईक, राजाभाऊ मगदूम, महादेव वडर, निवास कदम, सुनील जाधव, दीपक म्हाऊटकर, महेश चव्हाण, प्रदीप माने, विश्वजित पाटील, सुनील नाईक, सचिन बंडगर, यांच्यासह सरूड परिसरातील नागरिक , युवा वर्ग व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.