बांबवडे ची वहातुक कोंडी निर्मुलनासाठी कटिबद्ध – लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं वाहतुकीची कोंडी हा नित्याचाच त्रास आहे. यावर ग्रामपंचायत बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले व उपसरपंच आणि सदस्यमंडळ यांनी बांबवडे स्थानक इथं रस्त्यावर पांढरे पट्टे मारून वहातुक कोंडी निर्मुलन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

वहातुक कोंडी निर्मुलन साठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. बांबवडे इथं पंचक्रोशीतून भाजी विक्रेते येत असतात. आणि ते व्यवसाय करत असतात. भाजी विक्रेते येत असल्यामुळे वर्दळ वाढते. यासाठी शिस्तबद्ध करण्यासाठी चार फुट च्या आत मध्ये भाजी विक्रेते बसावे, तसेच रस्त्यावर मारलेल्या पट्ट्यांच्या आत मध्ये दुचाकी वाहने पार्क करावीत, तसेच चार चाकी वाहनांनी बाजार तळ इथं वाहने पार्क करावीत, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर एसटी बस चालकांनी सुद्धा एसटी त्यांना नेमून दिलेल्या जागेतच थांबवायच्या, असा निर्णय देखील घेण्यात आला आहे.


हा कटू निर्णय सगळ्यांना शिस्त लागावी, वाहनांची कोंडी होवू नये. आणि बांबवडे ची इभ्रत देखील वाढेल. यासाठी ग्रामपंचायत बांबवडे चे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळ यांनी हा निर्णय घेतला.

वहातुक कोंडी हा मुद्दा ग्रामपंचायत निवडणूक मधील अजेंडा मध्ये होता. आणि तो पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या अगोदर कचरा निर्मुलन करण्यासाठी घेतलेला निर्णय देखील त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या गावातून घंटागाडी फिरून कचरा उचलला जात आहे. त्यामुळे आरोग्याची तक्रार कमी होत आहे.

या अगोदर कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला होता. त्याचबरोबर वहातुक कोंडी हा यक्ष प्रश्न बांबवडे मध्ये उभा राहिला होता. याबरोबर अनेक मुद्दे अपूर्ण अवस्थेत होते. परंतु नवीन सदस्य मंडळ आणि कर्तुत्ववान सरपंच आणि उपसरपंच यांनी मिळून कामाला सुरूवात केली आहे. त्यातील दोन टप्पे पूर्ण केले आहेत. अनेक प्रश्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

एकंदरीत बांबवडे गावाचा विकास हा ध्यास घेवून सरपंच आणि इतर मंडळी राबत आहेत. त्यांच्या कालावधी मध्ये गावाचा संपूर्ण विकास करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

यावेळी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, सुरेश नारकर, अमर निकम, दिलीप बंडगर, उमेश चव्हाण, प्रकाश निकम, महादेव कांबळे, शामराव कांबळे, मुकुंद प्रभावळे, ग्रामपंचायत सदस्य, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.