पोहताना वहात गेलेल्या किसन कांबळे यांचा मृतदेह आज सापडला
शित्तूर तर्फ वारुण : उखळू तालुका शाहुवाडी येथील लक्ष्मण किसन कांबळे वय ५१ वर्षे यांचा मृतदेह वारणा नदीत आज आढळून आला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, दि.१७ मे रोजी किसन कांबळे हे मुंबई हून गावाकडे आले होते. गावी आल्यानंतर वारणा नदीत पोहण्यासाठी गेले. परंतु ते पोहत असताना प्रवाहाच्या वेगात सापडले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह आज वारणा नदीत आढळून आला आहे.

सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.