बांबवडे येथील वहातुक कोंडी फोडण्यासाठी केलेल्या कार्यवाहीची तहसीलदारांकडून पाहणी
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील वहातुक कोंडी फोडण्यासाठी बांबवडे ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच,उपसरपंच आणि सदस्य मंडळाने केलेली कार्यवाही पहाण्यासाठी तालुक्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी बांबवडे एसटी स्थानक परिसराला भेट दिली.

बांबवडे तालुका शाहुवाडी हे वहातुक कोंडीचे महत्वाचे ठिकाण आहे. शाहुवाडी तालुक्यातील वाहतुकीची कोंडी होणारी महत्वाची ठिकाणे म्हणजे बांबवडे व मलकापूर हि आहेत. मलकापूर येथील वहातुक कोंडीसाठी दि. १८ मे रोजी मलकापूर वासियांशी बैठक संपन्न झाली. आज दि.१९ मे रोजी बांबवडे चे सरपंच भगतसिंग चौगुले, उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते शामराव कांबळे, पत्रकार मुकुंद पवार हि मंडळी आजच्या बैठकीला उपस्थित होती.

या बैठकीत बांबवडे इथं गुरुवार दि.१८ मे रोजी वहातुक कोंडी फोडण्याच्या अनुषंगाने रस्त्याच्या दुतर्फा पांढरे पट्टे मारले आहेत. या पट्ट्याच्या बाहेर वाहन उभे केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच दुचाकी पार्किंग साठी जागा निश्चित केली गेली आहे. तसेच चार चाकी वाहनांसाठी देखील पार्किंग साठी जागा निश्चित केली आहे. दरम्यान शेतकरी वर्ग जो भाजी विक्रेता आहे, त्यांनी पांढऱ्या पट्ट्याच्या आत बसायचे आहे.

तसेच एसटी चालकांनी देखील त्यांना नेमून दिलेल्या जागेतच आपली एसटी बस उभी करायची आहे. यासंदर्भाने एसटी विभागाला देखील सूचना करण्यात आल्या आहेत. हि सर्व कार्यवाही ग्रामपंचायत बांबवडे यांनी स्वकल्पनेतून साकारली आहे. यापुढील कार्यवाही प्रशासनाची आहे,अशी विनंती लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगुले यांनी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांना केली आहे. यासाठी बुधवार दि.२४ मे रोजी व्यापारी वर्गाची बैठक बोलवण्यात आली आहे.


ग्रामपंचायत बांबवडे ने केलेली कार्यवाही पहाण्यासाठी तहसीलदार यांनी स्वत: भेट दिली.

यावेळी उपसरपंच स्वप्नील घोडे-पाटील, सुरेश नारकर, दिलीप बंडगर, प्रकाश निकम, दीपक पाटील, आनंदा प्रभावळे, बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन चे अध्यक्ष बाळासाहेब खुटाळे, शरद बाऊचकर, दत्तात्रय शेळके, बांबवडे चे मंडल अधिकारी, तलाठी मुलाणी, ग्रामसेवक कुरणे, पोलीस कर्मचारी बाबासाहेब चौगुले, शिवाजी पाटील, महादेव बंडगर, उमेश चव्हाण, आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.