आज दि.२० मे पासून कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह्यात आज दि.२० मे पासून दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवेदन कोल्हापूर जिल्हा आरटीओ विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात मागील काळात दुचाकींचे जे अपघात झाले होते, त्यामध्ये बहुतांश दुचाकी चालक हेल्मेट विना दुचाकी चालवीत होते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघातात मृतांची संख्या कमी व्हावी, यासाठी हि हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान या अगोदर सुद्धा हेल्मेट सक्ती करण्याचा कोल्हापूर जिल्ह्यात प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी समस्त कोल्हापूरकरांनी या हेल्मेटसक्तीला विरोध दर्शविला होता. त्यानंतर हेल्मेट सक्ती रद्द केली गेली. परंतु आजपासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश आरटीओ कोल्हापूर विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

या आदेशाला किती प्रतिसाद कोल्हापूरकर देत आहेत, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.