बांबवडे इथं एसटी निवारा शेड ची मागणी – श्री आनंदा पाटील (महाराष्ट्र मराठी एकीकरण समिती, उपाध्यक्ष )
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं एसटी बस पिक अप शेड उभे करावे, त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समिती उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी आपले सरकार या संकेत स्थळावरून केली आहे. तशा आशयाची निवेदने मलकापूर आगारप्रमुख, ग्रामपंचायत बांबवडे, विभागीय वहातुक अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे देखील त्यांनी केली आहे.

बांबवडे हे गाव एक मोठी बाजारपेठ आहे. या मध्यवर्ती ठिकाणाहून अनेक ठिकाणी प्रवासी ये-जा करीत असतात. परंतु अशा ठिकाणी निवारा स्थानक नाही. गेली अनेक वर्षांची हि दुर्दशा आहे. इथं ऊन, पाऊस, वारा अंगावर घेत अनेक प्रवासी एसटी ची वाट पहात असतात. या प्रवाशांमध्ये वयोवृद्ध, महिला, गर्भवती, लहान मुले, विद्यार्थी यांच्यासह अनेकजण तासोनतास एसटी ची वाट पहात थांबलेली असतात.

या मंडळींचा त्रास कमी व्हावा, या आशयाने हि मागणी महत्वाची आहे. यावर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेतून सुद्धा होत आहे.