वडगावात सोनसाखळी चोरी : तालुक्यात चेन स्नॅचिंग च्या घटनेत वाढ
बांबवडे : वडगाव तालुका शाहुवाडी येथील बस स्टॉप जवळ एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून चोरून नेले. त्यातील काही भाग महिलेच्या हातात राहिला, तर उरलेला भाग अज्ञात चोरटा घेवून सरूड दिशेला निघून गेला.

सदर घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, दि.२६ मे रोजी रात्री सव्वा दहा वाजनेच्या सुमारास सविता कृष्णात पाटील वय (४५ वर्षे ) व्यवसाय घरकाम राहणार सरूड, तालुका शाहुवाडी, या महिला आपली मुलगी प्रियांगी हिच्यासोबत वडगाव बस स्टॉप जवळ उभ्या होत्या. दरम्यान कापशी दिशेहून एक अज्ञात दुचाकी वरून आलेल्या चोरट्याने हिसडा मारून पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज म्हणजे गंठण चोरून पळ काढला. या सोन्याच्या ऐवजाची किमत सुमारे १,३५,०००/- अशी आहे.

दरम्यान शाहुवाडी तालुक्यात चेन स्नॅचिंग च्या घटना वाढू लागल्या आहेत. याबाबत पोलीस प्रशासन नेमकं काय भूमिका घेतंय? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.