मुंबई पोलीस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार – राजू शेट्टी
मलकापूर प्रतिनिधी (रोहित पास्ते ) :
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास, कोणत्याही क्षेत्रात यश नक्की मिळते, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.


बंबावडे तालुका शाहुवाडी इथं स्वाभिमानी विद्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यातील महाराष्ट्र पोलीस पदी निवड झालेल्या युवक व युवतींचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना शेट्टी पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी आयुष्यात ठेचा खाल्ल्याशिवाय यश मिळत नाही, शिवाय आपण इथपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे उपकार मानले पाहिजेत. ज्यांनी आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून लढण्याचे बळ दिले.
यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी, वैभव कांबळे, प्रकाश नाईक, भाई भारत पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी बांबवडेचे सरपंच भगतसिंह चौगुले, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुरेश म्हाउटकर, रायसिंग पाटील, जयसिंग पाटील, अवधूत जानकर, पद्मसिंह पाटील, व पोलीस पदी निवड झालेले युवक व युवती उपस्थित होते.