आंबर्डे पैकी रणवरेवाडी इथं देवरुख च्या तरुणाचा बुडून मृत्यू
मलकापूर प्रतिनिधी : आंबर्डे पैकी रणवरेवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव मध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आंबर्डे पैकी रणवरेवाडी येथील सर्जेराव रणवरे यांच्यासोबत मुंबई इथं डायमंड ज्वेलरी मध्ये काम करत असणारा मित्र तुषार गजानन बेर्डे वय २४ वर्षे राहणार तळसणे देवरुख तालुका संगमेश्वर जि. रत्नागिरी हा आपल्या मित्रांसोबत रणवरेवाडी इथं फिरावयास आला होता. शुक्रवार दि. २ जून रोजी हे मित्र येथील तलावात सकाळी ११ वाजनेच्या दरम्यान पोहावयास गेले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तुषार बुडाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी राखीव पथकाद्वारे शोध घेतला असता, दुपारी ३ वाजनेच्या दरम्यान त्याचा मृतदेह सापडला.

त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.