कोल्हापुरातील आक्षेपार्ह पोस्ट च्या निषेधार्थ बांबवडे इथं रास्ता रोको
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं शिवप्रेमी जनतेने काही काळ रास्ता रोको करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानास्तव कोल्हापुरात जी पोस्ट व्हायरल केली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ आणि असे करणाऱ्या अपप्रवृत्तीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. यास्तव आज दि.७ जून २०२३ सकाळी ११.०० वा. रास्ता रोको करून, निषेध करण्यात आला.

यावेळी शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी करीत काही काळ ” रास्ता रोको ” केला होता.

यावेळी पांडुरंग वग्रे आबा कट्टर शिवप्रेमी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं कोणी मनात देखील आणू नका. कारण महाराज हे आमचा आत्मा आहेत. अशा लोकांवर शासनाने कडक कारवाई करावी.

यावेळी सुरेश म्हाऊटकर यांनीदेखील आपल्या मनोगतात अशा अपप्रवृत्तींवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.

यावेळी मुकुंद पवार यांच्यासह अन्य मंडळींनी देखील आपली मनोगते व्यक्त केलीत.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश नारकर, राजू बुवा, विजय लाटकर, सचिन मुडशिंगकर, संजय पाटील, अमोल डवंग, विजय परीट, किरण गावडे, पवन पाटील, सारंग पाटील, गोरख पाटील, किशोर तळप यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.