” पंढरी च्या वारी इतकीच, रायगड ची वारी महत्वाची ” – शिवप्रेमी विनोद शेळके
बांबवडे : जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी रायगड ची वारी करावी, म्हणजे स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण ? हे त्या वारीतून आपल्या निदर्शनास येईल. ज्या पद्धतीने पंढरीची वारी आपल्यासाठी महत्वाची असते, त्याच पद्धतीने रायगड ची वारी सुद्धा तितकीच महत्वाची आहे, असे मत डोणोली तालुका शाहुवाडी येथील एक शिवप्रेमी असलेले श्री विनोद शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.

डोणोली येथील विनोद शेळके हे २००७ पासून रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्याला सायकल वरून प्रवास करीत उपस्थिती लावत आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल बांबवडे येथील शिवप्रेमी तरुणांनी त्यांचा बांबवडे इथं पुष्पहार, फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. ते आजच रायगड वरून शिवराज्याभिषेक सोहळा आटपून परतले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केले आहे. त्याचा आपण आदर केला पाहिजे. मी सुरु केलेली वारी प्रत्येक शिवप्रेमी ने केली पाहिजे. भविष्यात मी जिवंत असेपर्यंत, हि वारी करणारंच आहे. परंतु माझ्यानंतर देखील हि वारी सुरु राहिली पाहिजे, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.