बांबवडे त शांतता राखण्याचे आवाहन – पोलीस उपनिरीक्षक श्री प्रसाद कोळपे
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं शिवप्रेमी तरुणांनी पुकारलेल्या दि. ९ जून २०२३ रोजी चा कडकडीत बंद यशस्वी झाला. यावेळी पोलिसांनी संचलन करून पक्का बंदोबस्त ठेवला होता. जेणेकरून, समाजात शांतता राहील. त्या अनुषंगाने आज दि.१० जून २०२३ रोजी देखील कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रात्रीच्या बंदोबस्तानंतर आज दिवसाचा देखील बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.
काही दिवसांपूर्वी बांबवडे सरपंच आणि सदस्य मंडळाने गावात होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पार्किंग चे व्यवस्थापन चांगल्यारितीने केले, याबद्दल पोलीस निरीक्षक श्री प्रकाश गायकवाड यांनी या मंडळींचे अभिनंदन देखील यावेळी केले.
याचबरोबर गावात शांतता राखण्याचे आवाहन देखील श्री प्रकाश गायकवाड यांनी केले. याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांनी देखील येथील तरुण, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ यांची शांतता बैठक घेवून, शांतता राखण्याचे आवाहन केले.