बांबवडे पोलीस चौकीत एफ आय आर दाखल करता येईल – पोलीस निरीक्षक श्री प्रकाश गायकवाड
बांबवडे : आत्ता बांबवडे येथील दूरक्षेत्र पोलीस चौकीत ग्रामस्थांना आपली तक्रार नोंदवता येईल. म्हणजेच बांबवडे तालुका शाहुवाडी इथं एफआयआर दाखल करून घेण्यात येईल. अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

या अगोदर काही वर्षांपासून बांबवडे इथं पोलीस एफआयआर दाखल करून घेतली जात नव्हती. त्यासाठी नागरिकांना शाहुवाडी पोलीस ठाणे इथं जावे लागत होते.

बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाणे च्या कार्यक्षेत्रात सुमारे ४० गावे येतात. याचे क्षेत्रफळ सुद्धा तितकेच अधिक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना तक्रार नोंदवण्यासाठी सुमारे पंचवीस किलोमीटर अंतर प्रवास करून जावे लागत होते. त्यानंतर शाहुवाडी पोलीस ठाण्यात अधिकारी वर्ग आहे, किंवा नाही, याची देखील त्यांना माहिती नसते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता.

परंतु आत्ता बांबवडे येथील दूरक्षेत्र पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांना तक्रार दाखल करता येणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.