…अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकणार – मनसे शाहुवाडी
मलकापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाहुवाडी च्यावतीने तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त असलेले उपाधीक्षक पद लवकरात लवकर भरावे, अन्यथा मनसे च्या वतीने कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा वजा, अशा आशयाचे निवेदन तहलीदार रामलिंग चव्हाण यांना मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या हस्ते देण्यात आले.

तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक हे पद रिक्त असल्याने तालुक्यातील जनतेची खूप गैरसोय होत आहे. लोकांना नाहक फेऱ्या माराव्या लागत आहेत. म्हणून शाहुवाडी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे पद भरण्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मनसे चे प्रवीण कांबळे, शिवाजी फिरके, अक्षय खेडेकर, संदीप सातोसे, रोहित जांभळे, मिलिंद घोलप, रोहित घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.