वाकोली येथे पोलीस पदी नियुक्ती विद्यार्थ्यांचा सत्का
मलकापूर प्रतिनिधी
संघर्ष, कष्ट आणि त्याग यातून मिळवलेलं यश हे जीवनाला एक नवी प्रेरणादायी असते, आणि त्यातून मिळालेली जबाबदारी ही यशस्वीपणे पार पाडणे, हि आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे मत प्रतिपादन राष्ट्रपती पदक विजेते सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक बाजीराव पाटील यांनी वाकोली तालुका शाहुवाडी येथे केले.

वाकोली ता. शाहुवाडी येथे स्पर्धा परीक्षेतून पोलीस पदी निवड झालेल्या हर्षदा आरसेकर हिच्यासह इतर यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी सभापती सुभाषराव इनामदार, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर , सरपंच सुरेश घोलप, विजेंद्र करिअर अकॅडमी चे निलेश भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना बाजीराव पाटील म्हणाले की, कायद्याचं रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे. पोलीस दलामध्ये काम करत असताना, वेळेचं महत्व देखील आपणास असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील युवतीने अतिशय संघर्षमय कष्टाने मिळवलेले यश, हे नक्कीच प्रेरणादायी आहे. एकाग्रतेने अभ्यास करून यश मिळवणं महत्वाचं आहे. यापुढेही विविध स्पर्धात्मक परीक्षेतून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं, आणि आपल्यावर असलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी सभापती सुभाषराव इनामदार, गुंगा पाटील, निलेश भाकरे, गणेश चोरगे, हर्षदा आरसेकर दत्तात्राय आटूगडे, अक्षय जाधव, सुप्रभा कुंभार, काजल पाटील यांनी मनोगत व्यक्त केलीत.

प्रारंभी हर्षदा आरसेकर, सुप्रभात कुंभार, काजल पाटील, दत्तात्रय आठवडे, अक्षय जाधव, महेंद्र पाटील या सर्व पोलीस पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सुनील रोडे, एम एस सी बँकेचे संभाजी पाटील, लोळाण्याचे माजी सरपंच गुंगा पाटील, शेळके आदींच्या सह पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.