विराज कांबळे यांची १७ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वॉटर पोलो संघात निवड
मलकापूर प्रतिनिधी : युवा विकास फौंडेशन मलकापूर चे विकास कांबळे यांचे पुतणे विराज विनोद कांबळे यांची बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय सराव शिबिरातून १७ वर्षांखालील गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य वॉटर पोलो संघात निवड झाल्याबद्दल मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

यावेळी विकास कांबळे म्हणाले कि, सध्याच्या या घटनेने पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही दोघे भाऊ, बहिण राष्ट्रीय कबड्डी पश्चिम रेल्वे संघात खेळत होतो. आम्हा भावंडांमध्ये आता आमचा पुतण्या देखील सहभागी झाला आहे. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन .

यावेळी युवा विकास फौंडेशन मुख्य विश्वस्त विकास कांबळे, आई बाळाबाई कांबळे, भाऊ विनोद कांबळे, रूपा कांबळे, माजी उपसरपंच महेश कांबळे, जॉनी कांबळे आणि मान्यवर उपस्थित होते.