राजसाहेब ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त शिंपे इथं वृक्षारोपण
बांबवडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त शिंपे तालुका शाहुवाडी इथं मनसे सरूड विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या दिर्घायुष्याबद्दल अभिष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी शाहुवाडी तालुका उपाध्यक्ष कुणाल काळे, सरूड विभाग अध्यक्ष मधुकर पाटील, सवते शाखा उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, गट अध्यक्ष धीरज पाटील, स्वप्नील लाड, राहुल शिंदे आदी मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.