ढोलेवाडी ता.शिराळा येथील समाजसेवक श्री.शरद नायकवडी यांचा शिवसेनेत प्रवेश…
शिराळा प्रतिनिधी ( संतोष बांदिवडेकर ). : शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार बापू व युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन आपल्या दारी या कल्याणकारी योजनेच्या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न झाली.

या बैठकीच्या दरम्यान शिराळा तालुक्यातील ढोलेवाडी गावचे सुपुत्र समाजसेवक शरद नायकवडी यांची शिवसेनेच्या सागाव विभागाच्या विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली.

त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदकुमार निळकंठ, शिवसेना वाळवा तालुकाप्रमुख सागर मलगुंडे , शिवसेना शिराळा तालुका उपप्रमुख सतीशराव काटे, शिवसेना शिराळा शहर प्रमुख निलेश आवटे, शिवसेना करमाळा विभाग प्रमुख दयानंद चिमूर आदी उपस्थित होते.