नाईक कुटुंब सामाजिक कार्यात अग्रेसर : पीरपारसनाथ महाराज
शिराळा प्रतिनिधी ( संतोष बांदिवडेकर ):
शिराळा येथील नाईक कुटुंब विविध सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत, असे गौरवोद्गार गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पीर पारसनाथ महाराज यांनी केले.
.
शिराळा गोरक्षनाथ मंदिर ते पंढरपूर जाणारी गोरक्षनाथ पायी रथ दिंडी सोहळ्यास प.पु. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. भगतसिंग नाईक (नाना), स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव नगरसेवक विश्वप्रतापसिंह नाईक(दादा ) व संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते पृथ्वीसिंग नाईक (बाबा) यांनी पालखी रथास कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था करण्यासाठी जनरेटर भेट दिला. त्यावेळी पीर पारसनाथ महाराज बोलत होते.
जनरेटर मुळे दिंडीस जाणाऱ्या वारकरी लोकांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे, असे मत प्रतिपादन अवघड पीर आनंदनाथजी महाराज यांनी केले, आणि नाईक कुटुंबाचे आभार मानले .
यावेळी मरळनाथपूरचे सरपंच धनाजी मोरे , उपप्राचार्य बी.आर.दशवंत, प्रा.राजसिंह पाटील , जगन्नाथ बाऊचकर , सचिन शेठे , संतोष हिरुगडे , अवधूत गायकवाड ,रणजित यादव , महेश शिंदे , प्रसाद गिरी ,प्रवीण गायकवाड , रोहित गायकवाड , विक्रम यादव , विश्वजित गायकवाड , प्रा.देशमुख , प्रा.हिवराळे , डॉ.जाधव , डॉ.घारे तसेच परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.