मान्सून अभावी शेतकरी चिंताग्रस्त
आंबा प्रतिनिधी ( प्रकाश पाटील ) : सध्या मान्सून चा पाऊस लांबल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी जनता चिंताग्रस्त झाली आहे. तसेच जंगलातून येणारी कडवी,शाळी नदी चे पात्र सुद्धा कोरडे पडू लागले आहे. येत्या दहा दिवसात पाऊस पडला नाही तर, तालुक्यातील परिस्थिती चिंताग्रस्त होणार असून, भीषण पाणी टंचाई ला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.

दरम्यान पावसाचे मूळ नक्षत्र म्हणजे ” मृग ” नक्षत्र असते, ते अगदी कोरडे ठणठणीत जावू लागले आहे. मान्सूनपूर्व पाऊस यंदा झालाच नाही. परंतु मान्सून सुद्धा वेळेवर न आल्याने पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. भात, भुईमुग, नाचणी, यासारखी पिके यावेळेपर्यंत उगवून येतात.

परंतु यंदा पावसाने दिलेली ओढ, हि शेतकऱ्यांच्या चिंतेचा विषय बनली आहे.