भाजप चे संपर्क प्रमुख प्रवीण प्रभावळकर यांनी मुकुंद पवार यांचे अभिनंदन केले
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं भाजप चे शाहुवाडी – पन्हाळा संपर्क प्रमुख श्री प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर यांनी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले, तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक तसेच शाहुवाडी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद च्या वतीने देण्यात येणारा “आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार ” प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने प्रवीण प्रभावळकर यांनी मुकुंद पवार यांचे त्यांच्या राहत्या घरी जावून त्यांचे अभिनंदन केले.
त्यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश म्हाऊटकर, सुनील वाणी सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील श्री पवार यांचे अभिनंदन केले.