राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर मध्ये वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील यशवंत नगर-चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये २६ जून रोजी च्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त वक्तृत्त्व स्पर्धा संपन्न झाल्या..

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री डी.पी. गवळी सर व सर्व शिक्षकवृंद यांच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खबाले सर यांनी केले.

यानंतर १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी शिक्षण, उद्योग, कृषी, सहकार, व्यापार या अनेक क्षेत्रातील शाहू महाराज यांचे उल्लेखनीय कार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यांच्या विचारांचा वारसा या विषयांवर विद्यार्थ्यांनी भाषणे केलीत.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. पाटील आर.आर. यांनी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त केले.

यावेळी परीक्षक म्हणून सौ. भोसले एस.एस., सौ दिवे बी.एस., सौ. पाटील एस.आर. व सौ. खराडे एस.ए. यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांकडून वक्तृत्व स्पर्धेची उत्तम तयारी करून घेण्याचे काम शिक्षक वृंदाने केले.

वक्तृत्व स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
लहान गट – १. वेदांत प्रमोद कांबळे इ. २ री प्रथाम क्रमांक. २. जुई संतोष घाटगे २ री द्वितीय क्रमांक. ३. काव्या संग्राम पाटील इ.१ ली तृतीय क्रमांक.
मध्यम गट -१ . श्रेयस संदीप चिखलकर इ. ४ थी प्रथम क्रमांक. २. योगीराज दिगंबर भाकरे इ. ३ री. द्वितीय क्रमांक.
३. सिद्धी शाशिकंत सोरटे इ.४ थी तृतीय क्रमांक. १. आर्यन उत्तम सुंबे इ.६ वी प्रथम क्रमांक.२. अथर्व प्रमोद कांबळे इ.५ वी द्वितीय क्रमांक.३. प्रज्वल प्रदीप नाईक इ. ६ वी तृतीय क्रमांक.
मोठा गट – १. अपेक्षा मोहन पाटील इ.८ वी प्रथम क्रमांक.२. अक्षरा उत्तम पाटील इ. ७ वी द्वितीय क्रमांक. ३. अफानान निसार सुतार इ. ७ वी तृतीय क्रमांक.