” संपर्क ते समर्थन अभियान ” राबविणार – श्री प्रवीण प्रभावळकर
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी – पन्हाळा विधानसभा मतदार संघात ” संपर्क ते समर्थन अभियान ” राबविण्यात येणार असल्याची माहिती मतदार संघाचे संपर्कप्रमुख श्री प्रवीण प्रभावळकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले कि, अभियान अंतर्गत गेल्या नऊ वर्षात भाजप शासनाने किती समाजोपयोगी कामे केली आहेत. ती जनतेपर्यंत आम्ही पोहचविणार आहोत.

या माध्यमातून सेवा, सुशासन, आणि गरीब कल्याण योजना यशस्वीपणे राबविण्यात आल्या, याची माहिती जनतेला देणार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच या व्यतिरिक्त आणखी किती योजना जनतेला मिळाल्या, याची देखील माहिती या अभियान अंतर्गत देण्यात येणार आहे. आम्ही स्वत: जनतेच्या दारी जावून जनतेला या योजना पटवून देणार आहोत. असे देखील श्री प्रवीण प्रभावळकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी मो.क्र. ९०९०९०२०२४ या क्रमांकाशी संपर्क साधावा,, असे आवाहन देखील श्री प्रभावळकर यांनी यावेळी केले आहे.