लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न झाला.
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर यशवंतनगर – चिखली इथं दि.२१जुन २०२३ रोजी आंतरारष्ट्रीय योगदिन संपन्न झाला.

यानिमित्त योगप्रशिक्षक श्री निखील साळुंखे सर यांनी आपल्या जीवनातील योगाचे महत्व विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना योगाची प्रात्याक्षिके देखील करून दाखविले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्याक्षिके करून घेतलीत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री खबाले सर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक श्री गवळी सर यांनी श्री निखील साळुंखे यांचे स्वागत केले.

योगाची प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील केलीत. कार्यक्रमाचे आभार सौ.दिवे मॅडम यांनी मानले.