लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी वारकारी , वृक्ष दिंडी संपन्न
बांबवडे : आषाढी एकादशी निमित्त दि.२८ जून रोजी सकाळी ९.०० वाजता थेरगाव तालुका शाहुवाडी येथून शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या विद्यार्थ्यांनी वारकारी , वृक्ष दिंडी काढली.


या दिंडीचे स्वागत थेरगाव येथील पालक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक घोषणा दिल्या. त्याचबरोबर ” वृक्ष लावा घरोघरी “, रामकृष्ण हरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी ” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हि दिंडी ढोल ताशांच्या गजरात आणि टाळांच्या निनादात थेरगाव , गावातील मुख्य गल्लीतून काढण्यात आली. यानंतर पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.


इथून पुढे शेजारील सावर्डे गावात हि दिंडी बस मधून नेण्यात आली. तिथेसुद्धा गावातून दिंडी काढण्यात आली. घोषणा देण्यात आल्या. टाळांच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता. इथून हि दिंडी बस मधून श्री गोरक्षनाथ मंदिर इथं आणण्यात आली. याठिकाणी गुरु गोरक्षनाथ यांचे दर्शन घेण्यात आले. इथं विद्यार्थ्यांकडून प्रार्थना, ओंकार, नामस्मरण व जप करून घेण्यात आला.

इथं मठाधिपती यांनी आषाढी एकादशी चे महात्म्य उपस्थितांना सांगितले. यावेळी मठाधिपती बाबाजी यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले, तसेच प्रसादाचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री गवळी सर यांच्यासोबत शाळेचा शिक्षकवृंद उपस्थित होता.