गजापूर पैकी दिवाणबाग इथं वृद्ध महिलेचा खून
मलकापूर प्रतिनिधी : गजापूर पैकी दिवाणबाग तालुका शाहुवाडी इथं लक्ष्मी दगडू चौगुले वय ६० वर्षे यांचा राहत्या घराच्या हाता-पायांनी मारहाण करीत खून करण्यात आला असल्याची फिर्याद गणेश दगडू चौगुले वय ३९ वर्षे यांनी दगडू सखाराम चौगुले वय ७० वर्षे यांच्याविरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. सदर ची घटना २९ जून ते ३ जुलै २०२३ या दरम्यान घडली आहे.

शाहुवाडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश दगडू चौगुले हे मूळ रहाणार गजापूर पैकी दिवाणबाग तालुका शाहुवाडी येथील असून, सध्या मुंबईत ड्रायव्हर म्हणून काम करीत आहेत.

दरम्यान लक्ष्मी दगडू चौगुले या जेवण खायला देत नाहीत. व्यवस्थित आपल्याशी बोलत नाहीत, या रागापोटी त्यांनी मारहाण करून खून केला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत परड्यात पुरून ठेवले. असे हि आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम बुरुगडे आणि पोलीस कर्मचारी करीत आहेत.