मलकापूर ते आंबा खड्ड्यांचा महामार्ग – अपघाताला निमंत्रण देतोय …
आंबा प्रतिनिधी ( प्रकाश पाटील ) : शाहुवाडी तालुक्यातील कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर आंबा ते मलकापूर दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडले असून,प्रवाशांची, तसेच वाहन चालकांची तारेवरची कसरत सुरु आहे.

अशीच परिस्थिती आंबा ते विशाळगड दरम्यान असलेल्या रस्त्यावर सुद्धा खड्डे पडले आहेत. नागरिकांना व प्रवाशांना, पर्यटकांना याचा त्रास होत आहे.

पावसामुळे वीस किलोमीटर च्या महामार्गावरील येलूर, म्हावळेवाडी, भोसलेवाडी, निळे, वालूर फाटा, वारूळ, लव्हाळा, चांदोली,केर्ले, तळवडे, व आंबा या परिसरात जागोजागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे अपघातांना निमंत्रण देणारे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी, व पर्यटक वर्गातून होत आहे.