शाहुवाडी तालुका महिला कॉंग्रेस च्या वतीने मुकुंद पवार यांचे केले अभिनंदन
बांबवडे : शाहुवाडी तालुका महिला कॉंग्रेस च्या अध्यक्षा सौ. वैशाली सुभाष बोरगे व दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार श्री सुभाष बोरगे यांनी सपत्नीक येवून श्री मुकुंद पवार ज्येष्ठ पत्रकार यांचे आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.


गेली पाच वर्षे सौ वैशाली बोरगे या शाहुवाडी तालुका कॉंग्रेस कमिटी च्या अध्यक्षा असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. श्री सुभाष बोरगे यांनी देखील पत्रकारिता क्षेत्रात सुमारे २५ वर्षे काम केले आहे. तसेच शाहुवाडी तालुका पत्रकार संघातील ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत.

त्यांनी केलेल्या अभिनंदन बद्दल पवार कुटुंबीयांनी देखील त्यांचे आभार मानले.