श्री राजेंद्र निकम परिवाराकडून मुकुंद पवार यांचे अभिनंदन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील हॉटेल विश्वजित चे मालक श्री राजेंद्र आनंदराव निकम यांनी श्री मुकुंद पवार यांचे त्यांना आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या निवास स्थानी जावून त्यांचे अभिनंदन केले.


श्री राजेंद्र निकम हे पूर्वी दैनिक सकाळ मध्ये काम करीत होते. तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे नेहमीच योगदान असते. त्यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश म्हाऊटकर यांनी देखील अभिनंदन केले.

त्यांच्या या अभिनंदनाबद्दल पवार कुटुंबियांकडून त्यांचे आभार मानले.