श्री विजय पावले यांची कामगिरी प्रेरणादायी – श्री पृथ्वीसिंग नाईक
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर): जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंना बघून , भेटून व सवांद साधून त्यांच्या दायित्वाची कल्पना येते .या एका पिढीने प्रचंड कष्ट घेतल्यामुळे सुविधा नसणाऱ्या शिराळा तालुक्यातील पावलेवाडी सारख्या ग्रामीण भागाच्या नावलौकिकाला ते वाढवू शकते. त्यामुळे नव्या पिढीचे जोमाने या क्षेत्रात पदार्पण आवश्यक असल्याचे मत प.पु.स्वामी विवेकानंद सेवाश्रम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांनी केले.

विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट मधील स्टार खेळाडू श्री.विजय पावले याने नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये केलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

नाईक पुढे म्हणाले कि, विजयाची ही कामगिरी महाविद्यालयासाठी आणि आपल्या शिराळा तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले विजयाचा हा वारसा बघून आणि आत्मसात करून महाविद्यालयाच्या इतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याची प्रेरणा घ्यावी .

या वर्षीचा महाराष्ट्र प्रीमियर लीगचा विजेता संघ रत्नागिरी संघाचे प्रतिनिधित्व करताना विजयने एकूण दहा विकेट्स घेतल्या. तसेच एका सामन्यामध्ये त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकाविला. तसेच यावेळी विजयच्या भावी वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र बनसोडे म्हणाले , यशस्वी खेळाडुंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास त्यांना भविष्यात दैदिप्यमान कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल.
या कार्यक्रमास उपप्राचार्य बी.आर.दशवंत , प्रा. राजसिंह पाटील , डॉ. तानाजी हवलदार, डॉ. दिलावर जमादार, डॉ. विनायक भागवत , डॉ.दस्तगिर पठाण , प्रा.प्रमोद पाटील , अवधूत गायकवाड .याचबरोबर प्राध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.