सरूड च्या श्री निनाईदेवी दुध संस्थेतर्फे मुकुंद पवार यांचा सत्कार
बांबवडे : श्री निनाईदेवी महिला सह. दुध व्याव.संस्था मर्या. सरूड तालुका शाहुवाडी यांच्या वतीने शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांना जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यावतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेमध्ये शाल, फेटा, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.


मुकुंद पवार यांचे या संस्थेशी फार ऋणानुबंध आहेत. येथील संचालक व सभासद यांचा श्री पवारांशी वयैक्तिक सुद्धा संबंध आहेत. म्हणूनच हा सत्कार आपल्याला आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा वाटतो, असे श्री पवार यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. यावेळी श्री मनीष तडावळेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

श्री मनीष तडावळेकर यांची शाहुवाडी तालुका ग्राहक मंचाच्या उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे याबद्दल त्यांचा सुद्धा इथं संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी सर्वश्री बंडा भोपळे गुरुजी, माजी ग्रा.पं.स. बळवंत पाटील, संस्थेचे चेअरमन संपत खोत, सचिव अशोक पाडळकर, महादेव लाड, हेमंत पाटील, शंकर लोहार, मनीष तडावळेकर, मारुती चौगुले, महादेव वडार, कृष्णात चौगुले, ऋषिकेश खोत, बबन पाटील, तसेच संस्थेचा कर्मचारी वृंद देखील यावेळी उपस्थित होते.