वीज वितरण कंपनी विरोधात उद्या वीजबिलांची बांबवडे इथं होळी – नामदेव गिरी
बांबवडे :बांबवडे तालुका शाहुवाडी च्या एसटी स्थानकासमोर वाढीव वीज बिलाची होळी शिवसेनेच्या वतीने उद्या दि. ६ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी यांनी दिली आहे.

याबाबत ते पुढे म्हणाले कि, या महिन्यात वीज बिलात अवाढव्य वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वीज वितरण कंपनी च्या मनमानी कारभाराला चोख उत्तर देण्यासाठी उद्या निषेध म्हणून वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. या निषेध कार्यक्रमास सर्व शिवसैनिकांनी तसेच तालुक्यातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन देखील श्री नामदेव गिरी यांनी केले आहे.