सहा महसूल मंडलावर जनता दरबार संपन्न – तहसीलदार चव्हाण
आंबा प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील सर्व सहा महसूल मंडळावर दि.३ जुलै रोजी जनता दरबार संपन्न झाला. अशी माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

शाहुवाडी तालुक्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित अर्जांचे तातडीने निर्गतीकरण करण्याच्या उद्देशाने महसूल प्रशासनाच्या वतीने बहुदा पहिल्यांदाच जनता दरबाराचे नियोजन संपन्न झाले.

यासाठी मलकापूर, आंबा, बांबवडे, सरूड, भेडसगाव, करंजफेण, या महसूल मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी सद्यस्थितीत प्रलंबित असणारे विविध अर्ज तसेच दरबारात नागरिकांकडून प्राप्त होणारे अर्ज यांचा जागेवरच निपटारा करण्याच्या अनुषंगाने अधिनस्त सर्व अधिकारी कार्यालयीन व क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी या सर्वांना जनता दरबाराच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.