नारकर कुटुंबियांच्या कौतुक सुमनांनी सौहार्दाला त्सुनामी आली – मुकुंद पवार
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद पवार यांना कोल्हापूर जिल्हा परिषद च्या वतीने आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या घरी जावून, सर्वश्री नारकर कुटुंबियांच्यावतीने शाल, फेटा, श्रीफळ आणि लाडू देवून, त्यांचा सन्मान करण्यात आला.


बांबवडे तील नारकर कुटुंब नेहमीच अनेकांच्या सुख दु:खात सामील झालेले आजवर पहायला मिळाले आहे. अनेकांना त्यांनी त्यांच्या पडत्या काळात मदत केली आहे. तर आनंदाच्या क्षणी त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. प्रत्येक गोष्ट पैशाने होत नाही, तर काही नाती सौहार्दाने निभवावी लागतात.

त्याचाच हा प्रत्यय श्री मुकुंद पवार आणि कुटुंबाला आला आहे. सर्वश्री चंद्रकांत नारकर, सुरेश नारकर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखाताई सुरेश नारकर, त्यांच्या सोबत आलेले फेटे बांधण्यासोबत अनेक कलांमध्ये माहीर असलेले काशीद दाजी, आणि मितभाषी परंतु ज्ञानाने समृद्ध असलेले महादेव कांबळे साहेब या सगळ्यांनी श्री पवार यांच्या घरी जावून, त्यांना सपत्नीक सन्मानित केले.
याबाबत मुकुंद पवार म्हणाले कि, आपण केलेल्या सामाजिक कष्टाचे एवढे कौतुक आजवर कधी झाले नाही. सध्या पावसाने जरी ओढ दिली असली, तरी नारकर कुटुंबीयांनी केलेल्या कौतुकाचा वर्षाव प्रेमालाही त्सुनामी आणेल, असाच होता. याबद्दल सर्व पवार कुटुंबीय त्यांचे ऋणी आहे.