रुढी परंपरांना फाटा देत आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतामध्ये रक्षा विसर्जित : वृक्ष रोपांचे वाटप
शिराळा प्रतिनिधी(संतोष बांदिवडेकर):
आरळा (ता.शिराळा ) येथे एक आदर्श सेवानिवृत्त शिक्षक, निस्वार्थी व्यक्तीमत्व (स्व ) किसन ज्ञानदेव बेरडे यांचे वयाच्या ८५) व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबियांनी त्यांचे सर्व विधी पारंपरिक रुढी परंपरांना फाटा देत आधुनिक व वैज्ञानिकतेची जोड देत केले.
त्यांच्या रक्षाविसजर्नाला त्यांची रक्षा त्यांनी आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतामध्ये विसर्जित केली. तसेच उत्तर कार्याला उपस्थित लोकांना ५०० शेवगा रोपांचे वाटप करण्यात आले.
समाजात सुरु असणाऱ्या अनेक पारंपारिक रुढी परंपरागत चालींना, रितीरिवाजांना फाटा देत डॉ. सोमनाथ बेरडे, डॉ. प्रतिभा बेरडे यांनी पर्यावरणवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून लोकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या समाजशील उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक करण्यात आले आहे.
समाजात यापुढेही कायम अशा रुढी परंपरांना मुठ माती देण्यासाठी यापुढेही विविधांगी उपक्रमातून समाज प्रबोधन करणार असल्याची माहिती बेरडे कुटुंबियांनी दिली आहे.