शिराळ्यात सम्राटबाबा महाडीक यांचे घरोघरी संपर्क अभियान : मोदी शासनाच्या समाजोपयोगी विविध योजना
शिराळा- प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात ‘मोदी ॲट नाईन’(घरोघरी संपर्क) महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शिराळा शहरात महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राटबाबा महाडीक यांनी घरोघरी जावून, मोदींचे विचार व त्यांनी केलेल्या विकासाची माहिती दिली.

यावेळी महाडीक म्हणाले, ‘‘मोदी सरकारने जनतेसाठी विविध कल्याणकारी योजनांनी उपेक्षित गटांचे सशक्तीकरण केले. त्यांना महत्त्वाकांक्षी आणि स्वावलंबी बनण्यास मदत केली आहे. भारताने पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर नेतृत्व केले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहर सुशोभित व स्वच्छ करणे, जलजीवन मिशन, अमृत योजनेतून प्रत्येकास स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा, आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून नागरिकांना लाभ दिला जात आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभार्थ्यांना घरे, उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत नागरिकांना केवळ शंभर रुपयात गॅसजोड दिले जात आहेत.

यावेळी भाजपा नेते प्रतापराव पाटील, नगरसेवक केदार नलावडे, युवा नेते रामभाऊ जाधव, रवींद्र पवार, हारूनभाई शेख, राहुल खबाले, विकास रोकडे, सौरभ नलावडे, सचिन दिवटे, भूषण पाटील, अमित माने, बंडा निकम, शुभम जाधव, गणेश क्षीरसागर, शांताराम इंगवले, वैभव इंगवले, अमित नलावडे, अभिजीत नलावडे, सौरभ माने, मोहसीन नालबंद, प्रदीप नलावडे, अजित कुंभार, चेतन शिंत्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.