केंद्र शासनाने लोकहिताची कामे मार्गी लावलीत – श्री सत्यजित देशमुख
शिराळा प्रतिनिधी (संतोष बांदिवडेकर)
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती लोकांपर्यत पोहचवा. मोदीनी लोकहिताची कामे करत लोकांचा विश्वास जिंकला आहे. असे प्रतिपादन भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.

देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर देशभरात “मोदी@9” महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चरण, ता.शिराळा येथे पश्चिम विभाग लाभार्थी संमेलन व लोकांच्या भेटी समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास इचलकरंजी लोकसभा मतदार संघाचे भाजपा प्रमुख, सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख भाऊ यांनी उपस्थित रहात मार्गदर्शन केले. यावेळी लाभार्थ्यांशी चर्चा करून अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

सत्यजित देशमुख म्हणाले :- केंद्र सरकार ने देशातील प्रत्येक घटकाचा विचार करत लोकांना अपेक्षित असणारी कामे मार्गी लावली आहेत. जगातील बहुतांशी देशानी मोदीजी चे नेतृत्व मान्य केले आहे. हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. देशातील केंद्र सरकार व राज्यातील महायुती च्या सरकार ने मोठ्या प्रमाणात विकासकामे उभी केली आहेत. ती लोकां पर्यत पोहचवा, असे आवाहन देशमुख यांनी केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, शिराळा नगरपंचायत नगरसेवक अभिजीत नाईक पापा, वारणा साखर संचालक शामराव पाटील, आनंदराव पाटील, हिंदुराव नांगरे, शंकर नायकवडी, बी. डी. नायकवडी, मानसिंग पाटील, किनरेवाडी सतीश पाटील, देववाडी सरपंच शुभम खोत, नारायण खोत, जयवंत नांगरे, संजय पाटील, प्रदीप कदम, शहाजी बोबडे, सुनिल पाटील, संजय ठोबरे, भाजप सर्व कार्यकर्ते, लाभार्थी,जेष्ठ नागरिक,ग्रांमस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.