गोरगरिबांचे आधार ” विघ्नहर्ता क्लिनिक ” शिराळा
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील करमाळे सारखे खेडेगावात सामान्य कुटुंबातून वडील मुख्यधापक कै गंगाराम यादव यांच्या प्रेरणेतून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन जिद्दीने, चिकाटीने डॉ विक्रम यादव यांनी डॉक्टरची उच्च पदवी घेतली .

शहराकडे न होता डोंगराळ मागासलेल्या तालुक्यात एकही अत्याधुनिक सुविधा हॉस्पिटल उपलब्ध नसल्यामुळे येथील लोकांची होणारी परवड पाहून त्यांनी आपल्याच शिराळा तालुक्यात करमाळे गावातून विघ्नहर्ता क्लिनिक ची स्थापना केली .या भागातील रुग्णांची होणारी परवड थांबवण्याचा प्रयत्न केला. तसेच ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना शासनाच्या महात्मा फुले पंतप्रधान जन आरोग्य योजना आपल्या विघ्नहर्ता हॉस्पिटल मधून उपलब्ध करून परिसरातील हजारो रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला.

कोरोना काळात शिराळा शहरात अंत्री बुद्रुक, अंत्री खुर्द , करमाळे, निगडी, औंढी, शिरशी, पाडळी, या खेडेगावात असंख्य रुग्णांना जीवनदान देऊन त्यांनी देवदूत म्हणून काम केले.