टेकोली चा बंधारा उभा राहण्यापुर्वीच घसरला ? : पाणी अडवा पाणी जिरवा, योजनेचा फज्जा ?
बांबवडे : टेकोली तालुका शाहुवाडी येथील बंधाऱ्यावरील मुरूम घसरून गेल्याने, हा बंधारा किती निकृष्ट दर्जाचा केला होता, याचे प्रत्यंतर येते. पाणी अडवा, पाणी जिरवा या योजने अंतर्गत हा बंधारा बांधण्यात आला आहे.. अद्यापही जोरदार पाऊस नसूनही यावरील पिचिंग वाहून गेले असून, आतील कागद उघडा पडला आहे. अशा प्रकारची कामे शाहुवाडी तालुक्यात करून, ठेकेदार फक्त गब्बर होवू लागले असून, कामाची मात्र त्रेधा तिरपीट उडाली आहे. अशी माहिती टेकोली चे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कांबळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली आहे.


सदरचा बंधारा पनुंद्रे आणि टेकोली च्या हद्दीवर हा बांधण्यात आला आहे. सुमारे दोन ते तीन महिन्यात या बंधाऱ्याचे काम उरकले असून, तो किती निकृष्ट दर्जाचा आहे. याची खात्री अधिकारी वर्गाने जाग्यावर जावून केली तर, आपल्या निदर्शनास निश्चितच येईल.

दरम्यान शासनाने बंधारा तयार करताना ५०० मायक्रोन चा कागद वापरून त्यावर पिचिंग करण्याचे निर्देश केले होते. परंतु असे सांगून हि पहिला पाऊस तेवढ्या क्षमतेने अद्याप झालेला नाही , परंतु बंधाऱ्यावरील पिचिंग मात्र घसरून गेले आहे. भविष्यात पाऊस अधिक पडून हा बंधारा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे जीवितहानी देखील होवू शकते. यासाठी प्रशासनाने लक्ष देवून सदर गोष्ट गांभीर्याने घेवून, कामाचा दर्जा सुधारावा, अन्यथा बंधारा फुटून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता, यामध्ये ग्रामपंचायत चा काहीही संबंध नाही, अशी बेमुर्वत उत्तरे ठेकेदार ग्रामपंचायत सदस्यांना देत आहे. याबाबत त्वरित कारवाई होवून, सदरच्या कामाची दुरुस्ती व्हावी, व ठेकेदारावर कारवाई व्हावी,अशी मागणी श्री दत्तात्रय कांबळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केली आहे.