लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये गुरुपौर्णिमा संपन्न
चिखली प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये मंगळवार दि.४ जुलै रोजी गुरुपौर्णिमा / व्यासपौर्णिमा चे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने पालक माता – पिता पूजन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सरस्वती देवी तसेच शाळेचे प्रेरणास्थान असलेले लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलन शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळी सर, व पालक प्रतिनिधी शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री खबाले सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकवृंदाने उपस्थित सर्व पालकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यानंतर शाळेच्या शिक्षिका भोसले मॅडम, व शिराळकर मॅडम यांनी मनोगते व्यक्त केलीत.
मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या वतीने पालक, माता – पिता यांचे पूजन व आशीर्वाद कार्यक्रम संपन्न झाला. तसेच मातकाम स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्वत: मातकाम करून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन केले.
यावेळी पालकांनी सदर चे उपक्रम आजच्या पिढीसाठी गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले. एकंदरीत शाळेच्या गुणवत्तेबाबत पालक समाधानी असल्याचे निदर्शनास आले.
कार्यक्रमाचे आभार स्वप्नाली कांबळे यांनी मानले.