सामाजिक

बर्की चा ” तापेरा ” पर्यटकांना खुणावतोय…

आंबा प्रतिनिधी ( प्रकाश पाटील ) : निसर्गाने शाहुवाडी तालुक्यावर नैसर्गिक संपत्तीची उधळण केली आहे. इथली हिरवळ, वनराई, उंचच उंच झाडे, कड्यावरून कोसळणारे धबधबे, हे तालुक्याच्या नैसर्गिक साधनसंपत्ती त भरंच टाकतात. सध्या मान्सून सुरु झाल्याने तालुक्यातील धबधबे प्रवाहित झाले असून, ते पर्यटकांना खुणावत आहेत.


गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम घाटामध्ये जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे, अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. तालुक्यातील बर्की चा धबधबा हा नेहमीच पर्यटकांना खुणावत असतो. यंदा सुद्धा हा धबधबा प्रवाहित झाल्याने साडे तीनशे फुटावरून कोसळणारा ” तापेरा ” धबधबा हा निसर्गप्रेमींचे आकर्षण बनला आहे.


फेसाळणाऱ्या पाण्यातून निर्माण होणारे पांढरे शुभ्र रूप, खळखळणाऱ्या ओढ्याचा मनाला सुखावणारा आवाज निसर्गप्रेमींना उत्साहित करीत असतो. पावसात मनसोक्त भिजल्यानंतर पर्यटकांना मेजवानी म्हणून गावरान चिकन व नाचणीच्या भाकरीचा आस्वाद पर्यटकांना हवाहवासा वाटतो.


हिरवीगार दाट वनराई, किलबिल करणाऱ्या पक्षांचा किलबिलाट अशा नैसर्गिक वातावरणात पर्यटक मनसोक्त भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी विविध सेवा पुरविण्यात येत आहेत. पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, ओढ्यावर लोखंडी पूल, धबधब्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या, निसर्ग निरीक्षणासाठी मनोरे, वन अमृत उत्पादनांचे स्टॉल्स, इ. पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.


दरम्यान या वर्षापासून, धबधब्यालगत असलेल्या तलावामध्ये खाजगी बोटिंग चा अनुभव देखील आता पर्यटकांना घेता येणार आहे. निसर्गप्रेमींना हि एक नवी पर्वणी ठरत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!