मलकापूर – येळवण जुगाई मार्गावर उचत इथं सुपर कॅरी टेम्पो ची दोन युवकंना धडक
शाहुवाडी प्रतिनिधी : मलकापूर – येळवण जुगाई मार्गावर उचत गावाच्या हद्दीत मलकापूर दिशेहून भरधाव वेगाने आलेल्या सुपर कॅरी टेम्पो ने रस्त्याने चालत निघालेल्या दोन युवकांना जोरदार धडक दिली. या अपघातात उचत मधील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर इथं पाठविण्यात आले आहे. सदर घटनेची शाहुवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, नूतन पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सावन्त्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि, मलकापूर दिशेहून आलेला सुपर कॅरी टेम्पो भरधाव वेगाने आला होता. येताना त्याने एका रिक्षाला सुद्धा जोरदारपणे ओव्हरटेक केले होते. उचत गावाच्या हद्दीत लहीन गल्ली मध्ये रहात असलेले शाहीद शकील मालदार वय ( २४ वर्षे ), व साहिल जैनून अत्तार वय ( २३ वर्षे ) हे दोन्हीही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही तरुणांना धडक देवून, हा टेम्पो उचत येथील एका घरानजीक धडकला. टेम्पो चालक धोंडीबा नाना पाटील ( वय ४२ वर्षे ) रहाणार धनगरवाडी यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या टेम्पो चालकाने मलकापूर येथील एका नागरिकास देखील धडक देवून, पुढे आला होता. त्यानंतर त्याने उचत येथील चालत जाणाऱ्या या दोन युवकांना धडक दिली. हि धडक इतकी जोरात होती कि, या दोन्ही युवकांच्या टोप्या टेम्पो च्या केबिनजवळ पडलेल्या आढळल्या. टेम्पोचालक बेदरकारपणे वाहन चालवीत असल्याची चर्चा तेथील नागरीकातून ऐकावयास मिळत होती.
दरम्यान अपघातग्रस्त सुपर कॅरी टेम्पो ने या अपघाता अगोदर काही वेळापूर्वीच रिक्षाला ओव्हरटेक करून गेल्यानंतर काही अंतरावरच हा अपघात घडला. रिक्षाचालक संतोष लांबोरे याने वेळेचे गांभीर्य ओळखून दोन्ही अपघातग्रस्त युवकांना आपल्या रिक्षातून खाजगी दवाखान्यात नेले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर ला नेण्यात आले.

अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सावन्त्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुवाडी पोलीस ठाणे करीत आहे.