राजकीयसामाजिक

सावंतवाडी शिरसाटवाडी च्या ग्रामस्थांचे, मनसे चे सुझलॉन कंपनीच्या विरोधात आंदोलन, कंपनीचे काम पाडले बंद..

शिराळा प्रतिनिधी :(संतोष बांदिवडेकर :. शिराळा तालुक्यातील सावंतवाडी व शिरसटवाडीच्या ग्रामस्थांनी सुझलॉन कंपनीला तसेच कोकरूड पोलीस स्टेशनला कंपनी विरोधात निवेदन दिले होते.


निवेदनामध्ये कंपनीच्या जुन्या झालेल्या मशीन चुकीच्या पद्धतीने पाडू नये, जेणेकरून त्या मशीन मधील ऑइल, ग्रीस, वायरचे तुकडे व केमिकलयुक्त फायबरचे तुकडे तसेच धातूच्या वस्तू परिसरामध्ये पसरून चाऱ्यामधून जनावरांच्या पोटात जातील व जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होईल. तसेच पर्यावरणाची मोठी हानी होईल. याची काळजी घेऊन योग्य पद्धतीने क्रेनच्या साह्याने मशीन उतरवून डिसमेंटल करावी, असे न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु मुजोर कंपनीने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने गॅस कटरने मशीन शेतकऱ्यांच्या जागेत पाडून जनावरांच्या जीवास धोका निर्माण केला आहे. तसेच पर्यावर्णाचीही मोठी हानी केली आहे. सदर मशीन काढत असताना ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आलेली नाही व कर ही भरलेला नाही. पडलेल्या मशीन मुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ये-जा करायला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांना झालेल्या सर्व विषयाची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी आपल्या कार्यकर्त्यांसह पोचले व कंपनीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी कंपनीचे सर्व काम बंद पाडले.


यावेळी तानाजीराव सावंत म्हणाले सावंतवाडी, शिरसटवाडी मधील डोंगर परिसर हा निसर्गाने नटलेला आहे. याठिकाणी स्थानिक शेतकरी आपली जनावरे चरायला येत असतात. येथील शेतकऱ्यांचे जीवनमान पारंपरिक शेती व पशुधनावर अवलंबून आहे. कंपनीच्या अश्या चुकीच्या कामामुळे पर्यावरणाची हानी झाल्यास व शेतकऱ्यांच्या पशुधनास धोका निर्माण झाल्यास ते आम्ही खपवून घेणार नाही.


यापुढे कंपनीला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजावले जाईल. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . सरपंच संतोष शिरसट, उत्तम सावंत, सुरेश मस्कर, वसंत सावंत, अमर सावंत, धोंडीराम सुतार, खाशाबा शिरसट, शिवाजी शिरसट दिनकर शिंदे, तानाजी करजवडेकर, भास्कर रांजवन, राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!