नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांना प्रशासनाचे विनम्र अभिवादन
मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील पावनखिंड इथं नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने तहसीलदार श्री रामलिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांना मानवंदना दिली. यावेळी शिवभक्तांनी देखील बाजीप्रभू देशपांडे यांना विनम्र अभिवादन केले.

शाहुवाडी तालुक्यातील पांढरे पाणी इथं असलेल्या पावनखिंड येथील समाधीचे पूजन शाहुवाडी – पन्हाळ्याचे प्रांताधिकारी श्री समीर शिंगटे यांनी केले. समाधीवर पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी निखील खेमनार यांनी देखील अभिवादन केले. तहसीलदार रामलिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, यांनीदेखील यावेळी पूजन करून पुष्पचक्र वाहिले व अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार गणेश लवे, मंडल अधिकारी संभाजी शंदे, पोलीस खात्याचे बाबासाहेब किटे, प्रमोद गायकवाड, संतोष वेल्हाळ आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी व शिवभक्त यावेळी उपस्थित होते.