कांदे (ता. शिराळा) येथील तेजश्री गुरव हीची मंत्रालय सहाय्यक पदी निवड
शिराळा (प्रतिनिधी) : कांदे (ता. शिराळा) येथील तेजश्री गुरव हीची राज्य लोकसेवा आयोगामार्फत मंत्रालय सहाय्यक पदी निवड झाली आहे.
तेजश्री हीने दिलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ओ.बी.सी. मुलींमध्ये राज्यात पाचवा क्रमांक पटाकावला आहे. ‘विश्वास’ कारखान्याच्या संगणक विभागातील पर्यवेक्षक जयवंत गुरव यांची ती मुलगी आहे. तेजश्रीने मिळवलेल्या यशाबद्दल परिसरात कौतुक होत आहे.